
कोलकाता, 18 एप्रिल (हिं.स.) : वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि मालदा येथील हिंसाचार पिडीतांची राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस भेट घेणार आहेत. तसेच याप्रकरणाचा अहवाल ते केंद्र सरकारला पाठवतील.
हिंसाचारग्रस्त भागांना भेट देण्यासाठी भेट देण्यापूर्वी, राज्याचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी या घटनांना मृत्यूचे तांडव असे वर्णन केले.
राज्यपाल म्हणाले की, हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणारी मानसिकता मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंसाचाराच्या भयानक बातम्या येत आहेत. आपण हिंसाचाराला लगाम लावला पाहिजे. बंगालमध्ये शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
मुर्शिदाबाद आणि मालदासारख्या घटना कधीही घडू नयेत. बंगालच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मृत्यूचे नृत्य सुरू आहे - अशा प्रकारची हिंसाचार कधीही सहन केला जाऊ शकत नाही. हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर, त्यांच्याकडे एक कृती योजना असेल, ज्यावर मिशन मोडमध्ये काम केले जाईल, असे राज्यपालांनी सांगितले. हिंसाचारग्रस्त अनेक कुटुंबे झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात स्थलांतरित झाली आहेत. तसेच मालदा येथे उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांमध्ये देखील अनेक कुटुंबांनी आश्रय घेतला आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, कलकत्ता उच्च न्यायालयाने केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही काळासाठी मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले जातील. न्यायालय पीडितांच्या पुनर्वसनावरही लक्ष ठेवेल. या प्रकरणात सुरू असलेल्या राजकीय वक्तव्याबाबतही न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने विरोधी पक्ष - भाजप, सत्ताधारी - तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि इतर पक्षांच्या नेत्यांनाही प्रक्षोभक आणि तणाव वाढवणारी भाषणे न करण्याचे आदेश दिले आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी