नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.) आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचा तयारीला वेग आला आहे. बैठकांचा जोर सुरू आहे, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. सिंहस्थात २६० एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. शहरात दोन जलकुंभउभारण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट पाईपलाईनने हे पाणी या जलकुंभांमध्ये टाकले जाणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरणासाठी ७५० कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती गेडाम यांनी दिली. तसेच त्र्यंबकेश्वरमध्येही अगाच पध्दतीचा १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे दोन्ही आराखडे राज्याच्या नगरोत्थान विभागाला सादर केले जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा गदर्दीच्या ठिकाणी हे कैमरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांचाही प्रस्ताव लवकरच सरकारला सादर केला ---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI