शेकडो महिलांनी केले श्रीरामाच्या एक हजार नावांचे तुलसी अर्चन
नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.)। - श्रीकाळाराम जन्मोत्सव २०२५ मधील विविध कार्यक्रमात यंदाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या उपस्थितीत व नरेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामाच्या एक हजार नावांनी हे तुलसी अर्चन करण्यात आले. तुलसी अर्चन करण्यासाठी श
शेकडो महिलांनी  केले श्रीरामाच्या एक हजार नावांचे  तुलसी अर्चन


नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.)।

- श्रीकाळाराम जन्मोत्सव २०२५ मधील विविध कार्यक्रमात यंदाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या उपस्थितीत व नरेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामाच्या एक हजार नावांनी हे तुलसी अर्चन करण्यात आले. तुलसी अर्चन करण्यासाठी शहर परिसरातून शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमात तुलसी अर्चनाचे महत्व नरेश पुजारी यांनी सांगितले, ते म्हणाले, समाजात व घराघरातील वाद-विवाद संपुष्टात यावेत. सर्वांना निरामय आरोग्य लाभावे. आनंद, प्रेम व सुखाची प्राप्ती व्हावी. राष्ट्राचे कल्याण व्हावे, यासह समाजात शांतता नांदावी, संतांना अभिप्रेत असणारी विश्वशांती प्रत्यक्षात अनुभवता यावी, यासाठी हे तुलसी अर्चन करण्यात आले. श्रीरामाने या समाजातील संपूर्ण सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी जीवनभर कार्य केले. त्या श्रीरामाचा एखादा गुण प्रत्येक भक्ताने अंगी बाळगून त्यानुसार कार्य केल्याने आपल्या जीवनाचे कल्याण होईल. श्रीरामाच्या विविध कार्याच्या आढावा या सहस्त्र नामातून होत असल्याचे पुजारी यांनी प्रवचनातून सांगितले. पूजेनंतर सर्व भाविकांनी श्रीकाळारामच्या चरणी तुलसी अर्पण केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande