आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची आयएसएसएफ वर्ल्डकप २०२५ साठी निवड
कैरो, 2 एप्रिल (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची आगामी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या वर्ल्डकप २०२५ साठी निवड झाली आहे.आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ वर्ल्डकप २०२५ ही स्पर्धा १ एप्रिल ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान अर्जेंटिना आणि
Shooter sonam maskr


कैरो, 2 एप्रिल (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची आगामी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या वर्ल्डकप २०२५ साठी निवड झाली आहे.आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ वर्ल्डकप २०२५ ही स्पर्धा १ एप्रिल ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान अर्जेंटिना आणि पेरू या दोन देशांत होणार आहे. सोनम ३० मार्च २०२५ रोजी अर्जेंटिनाला रवाना झाली आहे. सोनमच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर गावची सुवर्णकन्या सोनम गेल्या दीड वर्षापासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) दिल्ली येथील अकॅडमीत सराव करत आहे. तिची ही गेल्या दोन वर्षांतील सहावी आणि सातवी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande