नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.)।
: रा. स्व. संघ जनकल्याण समिती जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक व बागलाण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मेडिकल स्कूल यांच्या आर्थिक साहाय्याने अपेक्स हॉस्पिटल येथे अपेक्स ब्लड स्टोअरेज सेंटरचे उदघाटन आमदार दिलीप बोरसे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किरण आहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या भागातील रुग्णाच्या नातेवाईकांना मालेगाव व नाशिकला न जाता योग्य दरात व कमीत कमी वेळेत रक्तपिशवी व रक्तघटक उपलब्ध व्हावेत या साठी जनकल्याणाच्या माध्यमातून सुरु झालेले अपेक्स ब्लड स्टोअरेज सेंटर हे रुग्णांसाठी व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यात जनकल्याण रक्तकेंद्राने विश्वास संपादन केला आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी उदघाटन प्रसंगी केले.
यावेळी जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, बागलाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, सचिव अनिल राका, मा. नगराध्यक्ष सुनील मोरे, देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, जनकल्याण समिती सटाणा समिती प्रमुख रोहित शिंपी, सटाणा मर्चंट बॅक मा. चेअरमन रुपाली कोठावदे,किराणा व्यापारी अध्यक्ष राजेंद्र राका, जनकल्याण रक्तकेंद्राचे सह कार्यवाह मदन भंदुरे, संचालक विशाल पाठक, प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, योगेश अमृतकार, मनोज केल्हे, भूषण पगारे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जनकल्याण रक्तकेंद्राच्या सटाणा तालुक्यात महिलांसाठी हिमोग्लोबिन जनजागृती अभियान राबविणार आहोत त्याचप्रमाणे थॅलेसेमिया मुक्ती साठी महाविद्यालय, सामाजिक संस्था याच्या सोबत थॅलेसेमिया या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यशाळा राबवून जनजागृती करणार आहोत विशेष बाब म्हणजे अपेक्स रक्त साठवणूक केंद्राच्या माध्यमातून सटाणा तालुक्यातील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्तपिशवी वितरित करण्यात येणार आहे, तसेच गरजू व आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या रुग्णांना विशेष सवलतीत रक्तपिशवी देण्यात येईल असे जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांनी सांगितले.- राजेश रत्नपारखी, अध्यक्ष(जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक )
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI