नगर - रोहित काॅस्मेटिक्सतर्फे खुल्या निबंध स्पर्धांचे आयोजन
अहिल्यानगर दि. 2 एप्रिल (हिं.स.) :- जैनधर्मीय २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त नवीपेठमधील रोहित काॅस्मेटिक्सतर्फे खुल्या निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोहित काॅस्मेटिक्सच्या संचालिका राणी मुथा यांनी दिली.

त्या म्हणाल्या, भगवान महावीर स्वामींनी दिलेले संदेश आजच्या संगणकयुगातही उपयुक्त ठरणारे आहेत. कोणालाही न दुखावता जगण्याचा आनंद घेण्यास सहाय्य करणे म्हणजे पुण्य कार्य करणे होय. जगा आणि जगू द्या, हा जैन धर्मातील भगवान महावीर स्वामींचा संदेश आजही प्रभावित करतो.निबंध स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धकांनी स्वतः विचार करत निबंध स्वअक्षरात ७०० शब्दापर्यंत लिहिणे अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी भगवान महावीरांचे संदेश आजच्या संगणकयुगातही उपयुक्त हा विषय ठेवण्यात आला आहे. स्वलिखित निबंध ८ एप्रिल पर्यंत रोहित काॅस्मेटिक्स, नवीपेठ, अहिल्यानगर येथे सिलबंद पोहोच करावेत. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. प्रथम तीन आणि दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच बक्षिसे काढली जातील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. ही स्पर्धा सर्वधर्मीयांसाठी खुली ठेवण्यात आली आहे, असे शरद मुथा यांनी सांगितले.

शहरातील युवती आणि गृहिणींना दर्जेदार सौंदर्य प्रसाधन उपलब्ध करून देणारे रोहित काॅस्मेटिक्स १७ वा वर्धापनदिन अक्षय तृतीयेला साजरा करताना भगवान महावीर स्वामींच्या निबंध स्पर्धांचे आयोजन करत आहे, असे शरद मुथा व राणी मुथा यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni

 rajesh pande