कांद्याला अनुदान द्या अन्यथा राज्यभर आंदोलन - दिघोळे
लासलगाव , 2 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर देखील कांद्याच्या बाजारभावाची घसरण थांबायचं नाव घेत नसून निर्यात बंदी उठविल्यानंतर देखील कांद्याचे भाव हे पडले आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून तात्काळ अनुदान द्या
निर्यातशुल्क हाटविल्यानतर ही कांदा दरात घसरण सुरूच   अनुदान द्या अन्यथा राज्यभर आंदोलन -  दिघोळे


लासलगाव , 2 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर देखील कांद्याच्या बाजारभावाची घसरण थांबायचं नाव घेत नसून निर्यात बंदी उठविल्यानंतर देखील कांद्याचे भाव हे पडले आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून तात्काळ अनुदान द्या अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केले आहेत.

सरकारने सर्वसाधारण वर्षभरापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भेटल्यानंतर कांद्यावर 40 टक्के निर्याशुल्क आकारले होते त्यानंतर सातत्याने हा निर्णय शुल्क मागे घ्यावे यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर ती केंद्र सरकार वरती शेतकऱ्यांनी विशेष करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलने केली दबाव टाकला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हे 20 टक्के मागे घेतले होते आणि 20 टक्के निर्यात शुल्क हे कायम ठेवलेले होते‌. मागील आठवड्यामध्ये केंद्र सरकारने हे 20 टक्के निर्यात शुल्क देखील मागे घेतल्यामुळे आता कांद्याचा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला. काल एक एप्रिल पासून हे निर्या शुल्क मागे घेतले परंतु मार्च अखेर असल्याने आज बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले.कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने खूपच दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये मोठ्या दरघसरणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे आज 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रती क्विंटलला कमीत कमी 700 जास्तीत जास्त 1602 तर सरासरी 1250 इतका दर मिळाला आहे. मार्च एंडच्या कारणाने बाजार समित्या बंद होण्यापूर्वी 27 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रती क्विंटलला कमीत कमी 800 जास्तीत जास्त 1690 तर सरासरी 1500 इतका दर मिळत होता सरकारने निर्यातशुल्क रद्द करण्यासाठी जास्त विलंब केल्याने शेतकऱ्यांचा कांदा शेताच पडून राहिला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे केंद्र सरकारने परदेशात जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी आता तत्काळ कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढण्यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande