विकेट घेतल्यानंतर लखनऊच्या गोलंदाजाच्या 'नोटबुक' सेलिब्रेशन वर सुनील गावस्कर नाराज
लखनऊ , 2 एप्रिल (हिं.स.)। आयपीएलमध्ये मंगळवारी(दि. १)लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्जने ८ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा स्पिनर गोलंदाज दिग्वेश राठीने प्रिय
Sunil gavskar


लखनऊ , 2 एप्रिल (हिं.स.)। आयपीएलमध्ये मंगळवारी(दि. १)लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्जने ८ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा स्पिनर गोलंदाज दिग्वेश राठीने प्रियांशची विकेट घेतल्यानंतर एका वेगळ्या पद्धतीने सेलेब्रेशन केलं. दरम्यान दिग्वेशच्या या कृत्यावर सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२५ मध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात प्रियांश आर्यला दिग्वेश राठीने आऊट केलं. प्रियांशची विकेट गेल्यानंतर त्याने नोटबुक स्टाईलध्ये सेलिब्रेशन केलं. हे पाहून सुनील गावस्कर यांनी दिग्वेश राठी याच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. गावस्कर म्हणाले की, असं सेलिब्रेशन करणं योग्य नाही. विकेट मिळाल्यावर गोलंदाजाने शांत राहिलं पाहिजे. जेव्हा फलंदाज चौकार मारतो, तेव्हा तो देखील असं काहीही करत नाही. या प्रकरणी दिग्वेशला बीसीसीआयकडून दंडही होऊ शकतो. अशा खेळाडूंना यापूर्वी आयपीएलमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात लखनऊच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत पंजाबसमोर १७२ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. तर पंजाब किग्सने १६ ओव्हर्समध्ये केवळ २ विकेट्स गमावून हा सामना जिंकला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६९ रन्सची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३० चेंडूत नाबाद ५२ रन्स केले. याशिवाय नेहल वढेरानेही ४३ रन्सचं योगदान दिलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande