चंद्रपुरात 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
नागपूर,20 एप्रिल (हिं.स.) : विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होतेय. विदर्भातील चंद्रपूर येथे आज, रविवारी कमाल 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर हे राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले तर नागपुरमध्ये 44. अंश
तापमान लोगो


नागपूर,20 एप्रिल (हिं.स.) : विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होतेय. विदर्भातील चंद्रपूर येथे आज, रविवारी कमाल 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर हे राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले तर नागपुरमध्ये 44. अंश सेल्सियस हे तापमान नोंदवण्यात आले.

विदर्भात सकाळी 8 वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. तर दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरतो. विदर्भात सर्वदूर पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून ब्रम्हपुरी व अमरावती येथे 44.4, वर्धा 44, अकोला 44.3, यवतमाळ 44.6, गडचिरोली 42.6, गोंदिया 42.2, वाशिम 42.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या भट्टीतही बुलढाणा थंड राहिले. तिथे 39.6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहाणार असून विदर्भात उष्णतेची लाट राहिल, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande