अमरावती जिल्ह्यात २.७५ लाख शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी
एप्रिल महिन्यात ५३.१२ टक्के शेतकरी नोंदणी अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)। केंद्र शासनाच्या ग्री स्टॉक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. या योजनेची १५ एप्रिल ही अंतिम ति
जिल्ह्यात २.७५ लाख शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी एप्रिल महिन्यात ५३.१२ टक्के शेतकरी नोंदणी


एप्रिल महिन्यात ५३.१२ टक्के शेतकरी नोंदणी

अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या ग्री स्टॉक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. या योजनेची १५ एप्रिल ही अंतिम तिथी असली तरी फक्त ५० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याचे सांगण्यात आले. राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवा वापरून शेतकऱ्यांवरील विविध शासकीय योजनांचा लाभ वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र सरकारची अॅग्रीस्टॉक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अभियानात एप्रिल महिन्यात ५३.१२ टक्के शेतकरी नोंदणी केली आहे. १५ एप्रिल ही या योजनेसाठी नोंदणीकरिता अंतिम तारीख होती. जिल्ह्यात एकूण ५ लाख १८ हजार ४००७ लाभार्थी शेतकरी असून अंतिम दिवसापर्यंत दोन लाख ७५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. त्याची टक्केवारी केवळ ५३.१२% असल्याचे कृषी विभागाच्या वतीने दिलेल्याअहवालातून दिसून येते. आधार लिंक केलेले शेतकरी व शेतीची माहिती, हंगामी पीक नोंदणी हंगामनिहाय पिकाची माहिती, भू संदर्भित नकाशे असे तीन मूलभूत माहिती तसेच माहिती संच तयार करण्यासाठी व अनुदानावर आधारित योजना बनविण्यासाठी हा तीन मूलभूत माहितीचा संच आवश्यक आहे.

योजनेपासून अपेक्षित लाभ

पी एम किसान योजनेतील लाभ प्राप्त करणे सोपे होईल. प्राप्त लाभार्थ्यांना पूर्णपणे कव्हर करण्यास मदत होईल. कर्ज कृषी निधी इंफ्रास्ट्रक्चर योजना यासाठी नोंदणी सुलभ होईल. पिक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनसाठी सर्वेक्षण सोपे होईल. किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी होईल. कृषी कर्ज व सेवा पुरविणाऱ्या संस्थांना डेटा उपलब्ध होईल. बारकाईने सत्यापण न करता योजनांचा लाभ त्वरित मिळेल, शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन व नवीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande