चंद्रपूर: आगामी 24 एप्रिल पर्यंत उष्णतेचा 'येलो अलर्ट'
चंद्रपूर, 21 एप्रिल (हिं.स.)।गत आठवड्यापासून जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक 21 ते 24 एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट ज
चंद्रपूर: आगामी 24 एप्रिल पर्यंत उष्णतेचा 'येलो अलर्ट'


चंद्रपूर, 21 एप्रिल (हिं.स.)।गत आठवड्यापासून जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक 21 ते 24 एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande