रत्नागिरी, 21 एप्रिल, (हिं. स.) : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचे स्वप्न प्रत्येक जण पाहतो. पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागतो, अशा दिव्यांग बांधवाना विमान प्रवास म्हणाने दुरापास्तव असतो. अशा अतितीव्र दिव्यांग बांधवांसाठी दुर्गाशक्ती सामाजिक चळवळीच्या अशोक भुस्कुटे परिवाराने विमान प्रवास सहल आयोजित केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ९ दिव्यांगांनी दिव्यांगांची गगनभरारी या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविला. आपल्या तीव दिव्यंत्वामुळे घराचा उंबरठा ओलांडता येत नाही, अशा दिव्यांगांना या विमान प्रवास सहलीसाठी निवडण्यात आले. गेली अनेक वर्षे दिव्यांगमित्र चिपळूण येथील अशोक विठ्ठल भुस्कुटे हा उपक्रम विनाशुल्क राबवत आहेत. यावर्षी मुंबई ते राजकोट असा विमान प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आते. दिनेश पोतनीस (डोंबिवली) यांनी विमान प्रवास तिकिटाचे प्रायोजकत्व स्वीकारले. चिपळूण पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
चिपळूणमधून टेंपो ट्रॅव्हलरने व्हीलचेअरसह हे दिव्यांग निघाले. सकाळी ९ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचून तेथून इंडिगो विमानातून राजकोटला रवाना झाले. विमानातील कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांना खूप छान सहकार्य केले. अवघ्या १ तासात राजकोट विमानतळावर ते पोहोचले. दुसया दिवशी मिनी बसने राजकोट गिरनार सफर घडविण्यात आली. आयुष्यात कधीच न जाऊ शकणाऱ्या दिव्यांगांना रोपवेने गिरनार पर्वताची सफर घडवणात आली. तिसऱ्या दिवशी सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, जंगल सफारी, दिव्यंगांनी काही काळासाठी आपते दिव्यांगत्व विसरून परिपूर्ण पर्यटनाचा आनंद घेतला.
गुजरातमधील संजय जानी या बसचालकाने स्वखर्चाने सर्व दिव्यांगांना व सहकाऱ्यांना उसाचा रस आणि शीतपेय पाजते. हॉटेल ते रेल्वे स्टेशन अशा प्रवासासाठी त्याने मोफत बससेवा उपलब्ध करून दिली.
सहलीच्या समारोपप्रसंगी आरएफपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिकभाई नाकाडे यांनी दिव्यांगांशी संवाद साधला. दुर्गाशक्ती अध्यक्ष अश्विनी अशोक भुस्कुटे यांनी राहभागी दिव्यांगांचे पुढीत आयुष्य सुकर होण्यासाठी काही सूचना दिल्या.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी