अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।
वडाळी वनपरिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची संख्या पाहता आणि वाढता उन्हाचा पार पाहता वन विभागाने वडाळी वन परिक्षेत्रात सहा कृत्रिम पानवठे तयार केले असून नियमित या पानवठ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे वन प्राणी शहराच्या दिशेने भटकत नाहीत.वडाळी वन परिक्षेत्रात बिबट, मोर, हरीण, रानडुकर, निलगाय, ससे असे बरेच वन्य प्राणी आहेत. तसेच बिबटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वडाळी । वनपरिक्षेत्रात बिबटची संख्या ४० ते ५० च्या आसपास असावी हे नाकारता येत नाही. तसेच हरीण व मोरांची सख्यासुध्दा जास्त प्रमाणात आहे. या जंगल परिसरात वेगवेगळे पक्षीसुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु उन्हाळा आला की वन्य प्राण्यांचा पिण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. जंगलात प्राण्यांना पिण्याकरिता पाणी मिळाले नाही तर ते शहराच्या दिशेने येतात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरालगत नवीन वस्ती झपाट्याने वाढत असून काही कॉलेज व शाळा सुध्दा शहराच्या बाहेर वन विभागाच्या जागेलगत आहेत. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सतत या परिसरात गस्तीवर राहतात. तसेच उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे जंगलातील पाणवठे व कृत्रीम पानवठ्यात मुबलक पाणी साठा नसतोत्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात शहराकडे येतात. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व वन्य प्राण्यांना मुबलक पाणी जंगलात मिळावे याकरीता वन विभागाने वडाळी वन परिक्षेत्रात सहा कृत्रीम पानवठे तयार केले असून रोज दुपारी या पानवठ्या टँकरने पाणी पुरवाठा केला जातो. प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळत असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास या पानवठ्यावर निरनिराळे प्राणी व पक्षी पाणी पिण्याकरिता उतरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी