अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा बालिकेवर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)। शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. घटनेची गंभीरता पाहता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ
पोलीस कर्मचाऱ्याचा बालिकेवर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. घटनेची गंभीरता पाहता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले. अरविंद विठ्ठल सोळंके (३८, रा. तपोवन) असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी अरविंद सोळंके हा आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील डायल ११२ येथे कार्यरत आहे. परंतु डिसेंबर २०२४ पासून तो सिक रजेवर आहे. तसेच पत्नी व एका लहान बाळासह तो तपोवन परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. सेच पीडितासुध्दा त्याच अपार्टमेंटमध्ये परिवारासह राहते. व्यामुळे दोन्ही कुटूंबाचे चांगले संबंध आहेत. दरम्यान अरविंदने पीडितेच्या व्हॉटसअॅपवर तू मला खूप आवडते मी तुझ्याशी लाम करणार, माझे तुझ्यावर प्रेम आहे. असा मेसेज पाठवीला होता. तसेच बिल्डिंग खाली उभा राहून तो नेहमी पीडितेला पाहत होता आणि हाताने इशारे करीत होता. परंतु पीडिताने त्याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे तो तिचा पाठलाग करु लागला. तसेच माझ्या सोबत बोल नाहीतर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देणार तसेच मी पोलीस आहे तुला आणि तुझ्या घरच्यांना खोट्या गुन्ह्यात फसवेल, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिता घाबरली आणि घरातून बाहेर जाणे बंद केले. ८ ते १० दिवसाआधी पीडिता बिल्डिंगमधून खाली उतरत असताना अरविंदने तिला पार्किगमध्ये पकडले आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडिताने आरडाओरडा केला. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. तेव्हा लगेच पीडिताच्या आईने ठाण्यात धाव घेतली. त्या आधारावर नांदगावपेठ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अरविंद सोळकेत्वा शोध सुरु केला. परंतु तो शहरातून पसार झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande