भारताकडून पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द, देश सोडण्याचे आदेश
- पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचे
भारत पाकिस्तान सीमा


- पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. मात्र वैद्यकीय व्हिसाची मुदत दोन दिवस वाढवण्याची सूचनाही देण्यात आली, त्यामुळे सदर व्हिसा २९ एप्रिलपर्यंतच वैध असणार आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अटारी-वाघा सीमेवरील चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, भोपाळमधील एका कुटुंबाला, जे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी अटारी-वाघा सीमेवर पोहोचले होते, त्यांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) परत पाठवले आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मंत्रालयाने पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनीही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले की, जे पाकिस्तांनी नागरिक सध्या भारतात वास्तव्यास आहेत त्यांनी व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा. तसेच भारतीय नागरिकांना आम्ही कळकळीचा सल्ला देतो की, त्यांनी पाकिस्तानात प्रवास करणे टाळावे. तसेच सध्या जे भारतीय पाकिस्तानात आहेत त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावे, असाही सल्ला आम्ही देतो.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, सार्क व्हिसा अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यासोबतच नागरिकांना पूर्वी जारी केलेले कोणतेही स्पेस (SPES) व्हिसा हे रद्द मानले जातील. तसेच १ मे पर्यंत वैध व्हिसा घेऊन आलेले लोकच या मार्गाने परत येऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande