रत्नागिरी : प्रेमसंबंधांच्या संशयातून एकाला मारहाण
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : शहराजवळच्या कुवारबाव येथे एका व्यक्तीला प्रेमसंबंधाच्या संशयातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच डोक्यावर आणि कपाळावर बॅटने मारून गंभीर दुखापत केली. ही घटना गेल्या २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सु
रत्नागिरी : प्रेमसंबंधांच्या संशयातून एकाला मारहाण


रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : शहराजवळच्या कुवारबाव येथे एका व्यक्तीला प्रेमसंबंधाच्या संशयातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच डोक्यावर आणि कपाळावर बॅटने मारून गंभीर दुखापत केली.

ही घटना गेल्या २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आनंद आकाराम घोडके (४४) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या घरी झोपलेले असताना आरोपी दत्ता बीरा यमगर, अशोक बीरा यमगर, आकाश शामराव रुकनर आणि त्यांची मुलगी यांनी घरात प्रवेश केला. आरोपी दत्ता यमगर याला फिर्यादीचे त्याची पत्नी रुक्मिणी दत्ता यमगर हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून दत्ता यमगर, आकाश रुकनर आणि स्नेहल घोडके यांनी फिर्यादी आनंद घोडके यांना ठोसे आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी अशोक यमगर याने फिर्यादीच्या डोक्यात आणि कपाळावर बॅटने मारून गंभीर दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आनंद घोडके यांना २३ एप्रिल रोजी सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी दत्ता बीरा यमगर, अशोक बीरा यमगर, आकाश शामराव रुकनर आणि स्नेहल आनंद घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande