नाशिक, 24 एप्रिल (हिं.स.)।
: बिलाची रक्कम दिल्यानंतर लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आल्याची चाहूल लागतात त्याने धुम ठोकण्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका आश्रम शाळेत घडले आहे. पोलिसांनी या मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या घराची झडती देखील सुरू केली आहे
खात्यावर जमा झालेल्या बिलाच्या मोबदल्यात 8 हजार आणि मार्च महिन्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी 1300 असे 9300 रुपयांच्या लाचेची मागणी करून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ततानी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे लाच लुचपत चे पथक पाहून मुख्याध्यापक ने शाळेच्या दुसऱ्या गेटने धूम ठोकली, जितेंद्र खंडेराव सोनवणे ,वय 45.रा. शासकीय आश्रम शाळा ततानी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पथकाकडून आता या मुख्याध्यापक चा शोध सुरू असून, याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेबडे, युवराज खांडवी यांनी ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI