छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात निर्णायक मोहिम
रायपूर, 25 एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. हेलिकॉप्टर्स, ड्रोन, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोहिम राबवली जात आहे. नक्षलवादाच्या मुळावर घाव घालणे, विशेषतः या
दहशतवाद्यांशी चकमक


रायपूर, 25 एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. हेलिकॉप्टर्स, ड्रोन, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोहिम राबवली जात आहे.

नक्षलवादाच्या मुळावर घाव घालणे, विशेषतः या भागात कॅम्प असलेल्या कुप्रसिद्ध पीएलजीए बटालियन क्रमांक 1 च्या नेतृत्वाचा नायनाट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सुमारे 10 हजारांहून अधिक जवानांनी सुमारे 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरले असून आत्तापर्यंतची अशी ही सर्वात मोठी मोहिम असल्याचे सांगितले जात आहे. सीआरपीएफ, कोब्रा, डीआरडी या सुरक्षा दलातील जवानांसह छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील पोलिसांचाही या कारवाईत समावेश आहे.छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या डोंगररांगेत जंगलामध्ये देशातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी नक्षलविरोधी मोहिम सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, पहिल्यांदाच सुरक्षा दलांनी आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये या मोहिमेला निर्णायक मोहीम असे संबोधले आहे. याठिकाणी नक्षलवादी चळवळीतील वरिष्ठ लीडर आणि कुख्यात कमांडर हिडमासह सुमारे 500 नक्षलवादी घेरले गेले आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी गैरहजर होते. ते छत्तीसगडमध्ये राहून वैयक्तिकरित्या या मोहिमेचे समन्वयन करण्यास प्राधान्य दिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना थेट या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगण्यात आले आहे. या मोहिमेचा चौथा दिवस सुरू असल्याची माहिती आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande