रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा वर्ल्ड ट्रेड सेंटरसोबत सामंजस्य करार
मुंबई, 25 एप्रिल, (हिं. स.) : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने वर्ल्ड ट्रेड सेंटरसोबत सामंजस्य करार करून तरुण उद्योजक व स्टार्ट-अप्सना सक्षम करण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. यशस्वी उद्योग व व्यापार हे समृद्ध राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. यासाठी
सामंजस्य करार


मुंबई, 25 एप्रिल, (हिं. स.) : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने वर्ल्ड ट्रेड सेंटरसोबत सामंजस्य करार करून तरुण उद्योजक व स्टार्ट-अप्सना सक्षम करण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे.

यशस्वी उद्योग व व्यापार हे समृद्ध राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. यासाठी तरुण उद्योजकांचा क्षमता विकास अत्यंत आवश्यक असतो. निती आयोगाच्या अटल इन्होव्हेशन मिशनअंतर्गत २०१९ पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील अटल प्रतिभा पोषण केंद्र (इन्क्युबेशन सेंटर - एआयसी) नव्या पिढीतील उद्योजकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व मदत करीत आहे. याच उद्दिष्टाला धरून अटल प्रतिभा पोषण केंद्र-आरएमपीने मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरसोबत एक सामंजस्य करार (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग) केला. तरुण प्रतिभावान लोकांना सक्षम करणे, उद्योजकतेचा विकास करणे आणि स्टार्ट-अप्सना जागतिक स्तरावर त्यांचा व्यवसाय विकसित करण्यासाठी उद्योगविश्वातील अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणे हा यामागील हेतू आहे.

जागतिक विस्तारासाठी संपर्क व नवनिर्मिती

स्टार्ट-अप्सना जागतिक व्यवसाय संधी व ग्राहक उपलब्ध करून देताना नवनिर्मिती व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हाळगी प्रबोधिनीच्या अटल प्रतिभा पोषण केंद्र व एम. विश्वेश्वरैया इंडस्ट्रीयल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (एमविआयआरडीसी) वर्ल्ड ट्रेड सेंटरची भागीदारी महत्त्वाची आहे.

या उपक्रमाची उद्दिष्टे अशी - १) जागतिक बाजारपेठेसाठी विस्तारायोग्य अशा स्टार्ट-अप्स शोधणे व त्यांना मदत करणे, २) उद्योजकता व नवनिर्मिती अभ्यासक्रमांचा एकत्रपणे विकास करणे, ३) जागतिक उद्योग नेत्यांसोबत संपर्क व व्यापारासाठी मदत करणे, ४) कार्यशाळा, प्रशिक्षण व जलद गतीचे अभ्यासक्रम आयोजित करणे, ५) उपक्रमांसाठी एकत्रित प्रसिद्धी, जाहिरात व वक्ता निवड

म्हाळगी प्रबोधिनीच्या मुंबईजवळील उत्तनमधील निसर्गरम्य ज्ञान नैपुण्य केंद्रात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी एमविआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कामकाज संचालक श्रीमती आकृती बागवे, सेंटर ऑफ एक्सलंस, एमविआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या प्रमुख श्रीमती स्मिता देशमुख आणि अटल प्रतिभा पोषण केंद्र-आरएमपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय वांकावाला उपस्थित होते.

श्री. वांकावाला म्हणाले, नवनिर्मिती व जागतिक बाजारपेठांतील अंतर भरून काढून स्टार्ट-अप्सच्या विश्वाला सक्षम करणे आणि होतकरू उद्योजक व व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या भागीदारीचा हेतू आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कार्य उल्लेखनीय असून आमच्या एकत्रित उपक्रमातून आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला नक्कीच हातभार लागेल. श्रीमती बागवे म्हणाल्या, तरुण उद्योजक व स्टार्ट-अप्सना सक्षम करणे, जागतिक संपर्काच्या संधी देणे आणि उद्योगाधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांना कार्यविस्तार करीत यशस्वी व्हायला मदत करणे यासाठी एआयसी-आरएमपीसोबत एकत्र काम करायला आम्ही उत्सुक आहोत .

शेती, शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञान या क्षेत्रांत उद्योगातून रोजगार निर्माण करणे हा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अटल प्रतिभा पोषण केंद्राचा हेतू असून यातून उद्योग व समाज दोन्हींना लाभ होत आहे. तरुण कौशल्यवान लोकांना प्रोत्साहन देण्यात हे अटल प्रतिभा पोषण केंद्र महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. यातून एकूण ५० हून अधिक कॉर्पोरेट भागीदाऱ्या, २० हून अधिक शैक्षणिक भागीदाऱ्या, १० हून अधिक गुंतवणूक भागीदाऱ्या व ७५ हून अधिक मार्गदर्शकांच्या मदतीने १०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्स यशस्वीपणे सुरू करून ७०० हून जास्त लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. स्टार्ट-अप्सच्या प्रणेत्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, होतकरू उद्योजकांसाठी पायाभूत अभ्यासक्रम, स्टार्ट-अप्ससाठी प्राथमिक कार्यशाळा आणि मूलभूत उद्योजकता विकास अभ्यासक्रम हे प्रबोधिनीच्या अटल प्रतिभा पोषण केंद्राचे प्रमुख उपक्रम आहेत.

आतापर्यंतच्या वर्गांमध्ये आरंभ कोहोर्ट, परिवर्तन व सामान्य कोहोर्ट, विभा कोहोर्ट व फास्ट ट्रॅक कोहोर्टचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande