अकोल्यात उबाठाला मोठा धक्का, 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश.
अकोला, 18 मार्च (हिं.स.)।सध्या निवडणुकांचे वारे शांत झाले असले तरी अकोल्यात पक्षांतराचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकोला महापालिका निवडणुकीनंतर आता उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4
Photo


अकोला, 18 मार्च (हिं.स.)।सध्या निवडणुकांचे वारे शांत झाले असले तरी अकोल्यात पक्षांतराचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकोला महापालिका निवडणुकीनंतर आता उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अकोल्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उबाठा गटात मोठी फूट पडली आहे. महापालिका निवडणुकीत उबाठाच्या तिकिटावर विजयी झालेले 6 नगरसेवकांपैकी मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात पार पडला.

विशेष म्हणजे, या घडामोडीत उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने हा धक्का आणखी मोठा मानला जात आहे. मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती.या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली असून स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्यसंख्या आता 53 वर पोहोचली आहे. शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उबाठा गटात आता केवळ 2 नगरसेवक उरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande