अकोला महापालिकेत स्वच्छता विभागाचा आढावा
अकोला, 18 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आज 18 मार्च रोजी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे त्यांच्या दालनात स्वच्छता विभागाची आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये सर्वप्रथम शहरात झोन नि
Photo


अकोला, 18 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आज 18 मार्च रोजी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे त्यांच्या दालनात स्वच्छता विभागाची आढावा सभा घेण्यात आली.

या सभेमध्ये सर्वप्रथम शहरात झोन निहाय प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता निरीक्षक वार्ड चपराशी तसेच स्वच्छता कर्मचा-यांची माहिती घेण्यात आली. तसेच दैनंदिन स्वच्छतेच्या कामात त्यांना येणा-या अडचणी बाबत विचारणा करण्यात आली. तसेच प्रत्येक प्रभागामध्ये 1 स्वच्छता निरीक्षक आणि 2 वार्ड चपराशी देणे, रस्त्यावर किंवा परिसरात ईतरत्र कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करणे, ट्रॅक्टर मध्ये कचरा पुर्ण क्षमतेने भरून नेणे, प्रभागात असलेल्या कच्च्या नाल्या व नवीन कलव्हर्ट बनविण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा अहवाल देणे, स्वच्छतेच्या कामात अडचण निर्माण करणारे रस्त्याच्या कडेला किंवा वार्डाच्या परिसरात खूप दिवसांपासून बंद पडलेल्या जुन्या वाहनांची आर.टी.ओ.विभागाशी समन्वय साधून ते जप्त करणे, स्वच्छता कर्मचा-यांची किमान तीन वेळा हजेरी तपासणे याचसोबत हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांची यादी देणे आदिंबाबत सुचना यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत नगरसेविका सुनिता अग्रवाल, नगरसेवक शरद तुरकर, सिध्दार्थ उपरवट, अमोल मोहोकार, मनपा उपायुक्त विजय पारतवार, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, संजय खोसे, मोटर वाहन विभागाचे शाम गाढे यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि वार्ड चपराशी यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande