नाशकात पहलगाम हल्ल्याचा 'अभाविप'तर्फे निषेध
नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक रोड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदेमातरम्, काश्मीर हो या गुवाहाटी
हल्ल्याचा 'अभाविप'तर्फे निषेध


नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)।

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक रोड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदेमातरम्, काश्मीर हो या गुवाहाटी- अपना देश अपनी माटी, जिस कश्मीर को खून से सिंचा वो कश्मीर हमारा है, अगर इस देश मैं रहना होगा वंदे मातरम् कहना होगा, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री मेघा शिरगावे यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये घडलेल्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करते. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. असा अन्याय आजचा युवक सहन करणार नाही.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande