अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ऋषिकेश गायकवाडची यूपीएससीमध्ये भरारी
अहिल्यानगर दि. 26 एप्रिल (हिं.स.) :- माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण असणाऱ्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा माजी विद्यार्थी ऋषिकेश राजेंद्र गायकवाड यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून अमृतवाहि
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ऋषिकेश गायकवाडची यूपीएससी मध्ये भरारी


अहिल्यानगर दि. 26 एप्रिल (हिं.स.) :- माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण असणाऱ्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा माजी विद्यार्थी ऋषिकेश राजेंद्र गायकवाड यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून अमृतवाहिनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल हे गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षणाचे केंद्र आहे . या स्कूलचे अनेक विद्यार्थी देशात व परदेशात विविध मोठ्या पदांवर काम करत आहे तसेच अनेक विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेमध्ये आपली सेवा देत आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा माजी विद्यार्थी असलेला व आश्वी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश राजेंद्र गायकवाड यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 610 क्रमांक मिळवला आहे. हे यश संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे म्हणून ऋषिकेश गायकवाड याचा अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांनी सत्कार केला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, स्कूलच्या प्रभारी प्राचार्य श्रीमती शोभा हजारे, डॉ.जे बी गुरव, डॉ एम ए वेंकटेश, डॉ मनोज शिरभाते ,डॉ. राजेंद्र वाघ डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, विलास भाटे आदींसह अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे शिक्षक विविध प्राचार्य उपस्थित होते.यावेळी बोलताना शरयू देशमुख म्हणाल्या की अमृतवाहिनी संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले असून हे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे त्याचप्रमाणे संस्थे तील इतर विभागांमधील अनेक विद्यार्थी देशात व परदेशात मोठ्या पदांवर चांगल्या पॅकेजवर कार्यरत आहेत.विद्यार्थ्यां च्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याने त्यांचे कुटुंब समृद्ध होते आणि याचा कायम अभिमान संस्थेला आहे.

ऋषिकेश गायकवाड म्हणाला की 2012-13 या शैक्षणिक वर्षांमध्ये मी अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मधून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालो. प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा मॉडेल स्कूल मधूनच निर्माण झाली यासाठी माझ्या शिक्षकांनी मला सातत्याने प्रेरणा दिली. ग्रामीण भागात असूनही इंग्रजी आणि इतर ज्ञान सातत्याने मिळवत गेल्याने मलाही यश मिळाले. यामध्ये संस्थेचा आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी हितेश राजपाल, दीपिका तांगडकर, परवेश शेख यांनीदेखील यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande