नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)।
बीएपीएस नाशिकच्या वतीने मेडिको स्पिरिच्युअल कॉन्फरन्स आयोजित केली आहे. आज रविवारी (२७ एप्रिल) सकाळी ९ वाजेपासून पंचवटीतील स्वामी नारायण मंदिर येथे ही परीषद होणार आहे. परीषदेचे समन्वयक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे ॲपेक्स मेंबर तथा प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व वंधत्व निवारण तज्ञ डॉ.उमेश मराठे हे या परीषदेसाठी समन्वयक आहेत. परीषदेत तज्ञ व्यक्ती सहभागी डॉक्टरांशी विविध विषयांवर संवाद साधणार आहेत.
नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगलोरचे अपेक्स मेंबर म्हणून डॉ.उमेश मराठे यांची निवड झाली. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना डॉक्टर वर्गासाठी त्यांनी अनोख्या उपक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. 'थिंक डिफ्रंट, बी डिफ्रंट' अशी या परीषदेची संकल्पना असल्याची माहिती समन्वयक डॉ.उमेश मराठे यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना डॉ.उमेश मराठे म्हणाले की, या परीषदेत 'थिंक डिफ्रंट, बी डिफ्रंट' या विषयावर मोटिव्हेशल स्पिकर व स्पिरिच्युअल स्कॉलर पुज्य अपूर्वमुनी स्वामी मार्गदर्शन करणार आहेत. 'डॉक्टरांचे आयुष्य' या विषयावर हृदयविकार तज्ज्ञ आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे येथील ट्रेनर डॉ.राजेश धोपेशवारकर यांचे सत्र पार पडणार आहे. या परीषदेत सकाळी ९ वाजता सहभागींचे स्वागत केले जाईल. यानंतर मंदिर दर्शन व अभिषेक सोहळा होईल. व नाष्टा झाल्यानंतर सत्रांना सुरुवात होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत हे सत्र पार पडणार आहेत. यासोबत डॉक्टरांच्या पाल्यांसाठी स्वतंत्र असे सत्र मंदिराच्या परीसरात पार पडणार आहे. या सत्रामध्ये मुलांना त्यांच्या आयुष्यात प्रभावी कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI