अहिल्यानगर, 26 एप्रिल (हिं.स.)।
अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून सुरु असलेल्या महावीर कप 2025 च्या विविध क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यामध्ये आयपीएलच्या धर्तीवर डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार असून 16 संघांनी सहभाग घेतला आहे, त्याचबरोबर रस्सीखेच, बॅडमिंटन, रिले धावणे स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली असून नगरकर स्पर्धा पाण्यासाठी मोठी गर्दी करत असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे, अक्षरशा वाडिया पार्कमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळत आहे, तसेच खेळाडूंमध्ये एकोपा निर्माण होत आहे, भगवान महावीर कप स्पर्धाही नगरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे, असे मत मा.नगरसेवक संजय चोपडा यांनी व्यक्त केले
या स्पर्धेसाठी शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशन, मर्चंट बँक, इलाईट कॉर्पोरेशन, मनोज छाजेड, अरिहंत बिझनेस सेंटर, महावीर ग्रुपचे राजेश भंडारी, ऐ.पी (इन्क्रोप) चे अशिष पोखरणा, जयकुमार मुनोत, नरेंद्र बाफना, वर्षा इंडस्ट्रीज, अतुल पारख, कॅमल साबुदाणा, अभय भंडारी आदींचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या सुरुवातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्या असून या मृतकांना भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजेंद्र गांधी म्हणाले की, धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे अक्षरशा दुर्लक्ष करत असतात. मात्र, भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची गोडी निर्माण होत असून व्यायामाकडे आकर्षित केले जाते. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते.आदर्श व्यापारी मित्र मंडळ व मॉर्निंग क्रिकेट क्लबचे युवक एकत्रित येत शहरात भगवान महावीर कप स्पर्धेच्या माध्यमा तून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. या माध्यमातून खेळाडू आपल्या खेळाचे प्रदर्शन करत असतात, असे ते म्हणाले.
वाडिया पार्क येथे भगवान महावीर कप मोठ्या उत्साहात सुरु असून यावर्षी क्रिकेट स्पर्धे बरोबरच ४०० मीटर धावणे, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. क्रिकेट खेळता येत नसणाऱ्यां ना इतर स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे. आय.पी.ए.ल च्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून, १६ संघ सहभागी होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेत सुमारे २००० खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये भगवान महावीर कप हे मानाचे पारितोषिक असून १ लाख ११ हजार १११ रुपये तसेच दुसरे पारितोषिक ५१ हजार रुपये तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक मॅचला (मॅन ऑफ द मॅच) (बेस्ट बॉलर) (बेस्ट फिल्डर)(बेस्ट बॅट्समन) आदी पुरस्काराने खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. तसेच (मॅन ऑफ द सिरीज) चा देखील पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आदर्श व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंगवी यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni