नाशकात सायकलिस्ट्सकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण
नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। : जम्मू-काश्मीरच्यापहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध नागरिकांना नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे मेणबत्ती प्रज्वलित करून यशवंतराव महाराज पटांगण येथे श्रद्धांजली वाहण्यात आली
नाशकात सायकलिस्ट्सकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण


नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)।

: जम्मू-काश्मीरच्यापहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध नागरिकांना नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे मेणबत्ती प्रज्वलित करून यशवंतराव महाराज पटांगण येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनाला अतिशय वेदना देणारी आहे. या हल्ल्याने देशात संतापाची लाट पसरली असून, या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे.

नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे सदस्य त्यांच्या निवासस्थानाहून सायकलिंग करत सायंकाळी यशवंत महाराज पटांगण येथे जमले. सर्वांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून पोस्टर हातात घेतले. त्यावर 'आतंकवादनहीं सहेंगे', 'दहशतवादी संघटना मुर्दाबाद', 'पहलगाम भ्याड हल्ल्याचा निषेध', 'इंडिया विल नॉट फॉरगीव्ह' आदी संदेश लिहिलेले होते. मेणबत्ती प्रज्वलित करून भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, सचिव संजय पवार, उपाध्यक्ष डॉ. मनीषा रौंदळ, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, माजी खजिनदार रवींद्र दुसाने, संचालक प्रवीण कोकाटे, माधुरी गडाख व सदस्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande