नाशिक , 26 एप्रिल (हिं.स.)।
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी योजना मनमाड शहरासाठी तयार करण्यात आली असून या योजनेतून मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून याच योजनेचा भाग म्हणून शहरातील प्रत्येक वार्डात नवीन पाईपलाईन टाकून त्यावर नवीन कनेक्शन जोडणी करण्यात येत आहे. मात्र, ही जोडणी करताना थकीत घरपट्टी व पाणीपट्टी शक्तीने वसुली करण्यात येत असून सर्वच जण आर्थिक सक्षम नसल्याने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी व सक्तीची वसुली करू नये, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख खालिद शेख यांनी एका पत्राद्वारे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याकडे केली आहे.
पाणीटंचाई मनमाड शहराच्या पाचवीला पुजलेली असून यातून मुक्तता व्हावी यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या याचाच एक भाग म्हणून साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे काम अंतिम टप्प्याकडे आले असून मनमाड शहरातील प्रत्येक वॉर्डात नवीन पाईपलाईन टाकून त्यावरून कनेक्शन देण्याचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे नवीन कनेक्शन देताना पालिकेचे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी सक्ती करत आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख खालील शेख यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांना पत्र लिहून शहरातील प्रत्येक नागरिकांची परिस्थिती ही चांगली नाही. अनेक गोरगरीब कुटुंब सकाळी कामाला जातील तर संध्याकाळी खातील अशा परिस्थितीत आहे. अशा नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी सक्ती करू नये उलट अशा नागरिकांना पालिकेने सवलत देऊन टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यासाठी मदत द्यावी व त्यांना तात्काळ कनेक्शन जोडणी करून द्यावी अशी विनंती पत्रद्वारे केली आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI