सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषाने डॉक्टरांना चिठ्ठी पाठविली होती. घटनेपूर्वी वळसंगकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती. त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली. ती मिळविण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली; पण चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिस सूत्राने स्पष्ट केले.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे अनाकलनीय गूढ निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला २३ एप्रिलपर्यंत आणि त्यानंतर २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत तपासात मनीषाने कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केले नाही. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या जबानी घेतल्या. डिसेंबर २०२४ पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड