पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्याचा बहाणा करून चांदीच्या पादुकाच चोरणारा गजाआड
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। संतबाळू मामा यांची पालखी मौजे व्होळे, ता. पंढरपूर येथे मुक्कामी होती. सदर पालखीमध्ये दीड किलो वजनाचे चांदीच्या श्री. संत बाळूमामा यांच्या पादुका होत्या. रात्रीच्या वेळी पालखीच्या संरक्षणासाठी रणजीत माने हे रखवालदार थांबल
पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्याचा बहाणा करून चांदीच्या पादुकाच चोरणारा गजाआड


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

संतबाळू मामा यांची पालखी मौजे व्होळे, ता. पंढरपूर येथे मुक्कामी होती. सदर पालखीमध्ये दीड किलो वजनाचे चांदीच्या श्री. संत बाळूमामा यांच्या पादुका होत्या. रात्रीच्या वेळी पालखीच्या संरक्षणासाठी रणजीत माने हे रखवालदार थांबले होते.रात्री 12/15 वा. च्या सुमारास एक चोरटा पालखीचे दर्शन घेणाचा बहाणा करून पालखीजवळ गेला.

पालखीचे दर्शन घेवून पालखीतील दोन्ही पादका काढून रस्त्याच्या बाजूने पळत निघाला. परंतू रखवालदार माने यानी त्याचा संशय आला त्यावेळी त्यांनी आरडाओरड केला.लोकांनी पळून जाणारे इसमाचा अंधारात शोध घेतला, परंतू तो चांदीच्या पादुकासह निघून गेला. त्याबाबत पालखीचे कारभारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाणेस गु.र.नं 41/2025 भा.न्या.सं.क 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.या गुन्ह्याचा तपास करकंब पोलीस करत होते. यामध्ये करकंब पोलीसांना गोपनिय बातमीदाराने मौजे खरातवाडी येथील इसमन बालाजी खेला खरात हा मागील काही दिवसापासून चैनी करत असल्याची माहिती पुरवली.तेव्हापासून पोलीसांनी त्याच्यावर नजर ठेवून माहिती काढली असता दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी व्होळे येथील पादुका यानेच चोरी केले असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेवून पोलीस अधिक विश्वासात घेवून तपास केला असता बाळू मामा यांच्या पालखीतील चांदीच्या पादुका चोरी केले असल्याची कबूली दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande