संकलित मूल्यमापन चाचणीच्या गुण नोंदणीसाठी ५ मेपर्यंत मुदत
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित मूल्यमापन ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत शासकीय व स्थान
संकलित मूल्यमापन चाचणीच्या गुण नोंदणीसाठी ५ मेपर्यंत मुदत


पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)।

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित मूल्यमापन ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. आता या चाचणीच्या गुण नोंदणीसाठी येत्या ५ मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात आलेली आहे. संकलित मूल्यमापन चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. मूल्यमापनांचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.विद्या समीक्षा केंद्र यांचेमार्फत चॅटबॉट संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. चॅटबॉटवर गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकेची लिंकही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande