आरोग्यमंत्र्यांची हेमलकसा येथील 'लोकबिरादरी'ला भेट; अहेरीतील रुग्णालय सुविधांचे दिले निर्देश
गडचिरोली., 13 फेब्रुवारी (हिं.स.) राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी रॅमन मॅगसेसे
हेमलकसा येथे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांची भेट


अहेरी रुग्णालयाला भेट व पाहणी


गडचिरोली., 13 फेब्रुवारी (हिं.स.)

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकल्पाच्या कार्याची पाहणी केली.५२ वर्षांच्या सेवेचा आढावा आणि संवादभेटीदरम्यान मंत्री आबिटकर यांनी डॉ. आमटे यांच्याशी संवाद साधला. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सेवा देण्याच्या प्रेरणेबद्दल विचारले असता, डॉ. आमटे यांनी गेल्या ५२ वर्षांच्या प्रवासाचा उलगडा केला. सुरुवातीची २२ वर्षे वीज नसतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही सेवा अखंड सुरू ठेवली, असे डॉ. आमटे यांनी यावेळी नमूद केले.सर्पदंशावरील उपचारांसाठी विशेष मागणीप्रकल्पातील आरोग्य सुविधांची पाहणी करताना डॉ. प्रकाश आमटे यांनी मंत्र्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली. भामरागड परिसरात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने, यावरील औषधोपचारांसाठी विशेष सवलत आणि अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.अहेरी व भामरागड रुग्णालयांची पाहणी

हेमलकसा येथील भेटीनंतर आरोग्यमंत्र्यांनी आपला मोर्चा शासकीय रुग्णालयांकडे वळवला.

-

अहेरी उपजिल्हा रुग्णालय: येथे भेट देऊन त्यांनी पायाभूत सुविधा, औषधसाठा आणि रुग्णसेवेचा आढावा घेतला.

-

रिक्त पदांबाबत निर्देश: रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आणि आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.

-

भामरागड ग्रामीण रुग्णालय: येथील मनुष्यबळ आणि सेवांचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर सकारात्मक कार्यवाही केली जाईल.

— प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande