मुरुडमध्ये निवडणूक नियमभंग; शासकीय पदाचा वापर प्रचारासाठी
रायगड, 13 फेब्रुवारी (हिं.स.)। मुरुड-जंजिरा शहरात निवडणूक आचारसंहितेच्या काळातच शासकीय कार्यालयाचा गैरवापर करून राजकीय प्रचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुरुड पोलीस ठाणे हद्दीत
murud


नगराध्यक्ष कक्षातच आचारसंहितेचा भंग! शासकीय कार्यालयातून राजकीय प्रचार; गुन्हा दाखल


रायगड, 13 फेब्रुवारी (हिं.स.)। मुरुड-जंजिरा शहरात निवडणूक आचारसंहितेच्या काळातच शासकीय कार्यालयाचा गैरवापर करून राजकीय प्रचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुरुड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 04/02/2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद मुरुड-जंजिरा कार्यालयातील नगराध्यक्ष कक्षात ही घटना घडल्याचे समोर आले. महिला आरोपी (रा. रणदिवेआळी, ता. मुरुड) यांनी अधिकृत शासकीय पद व कार्यालयाचा वापर राजकीय प्रचारासाठी केल्याचा आरोप आहे.

या कृत्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुरनं. 24/2026 नुसार भा.न्या.संहिता कलम 174, 223 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 123(7) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोसई श्री. केंद्रे करीत असून, या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande