सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील बेकायदा 96 बांधकामांपैकी 27 प्रकरणाची सुुनावणी पुर्ण झाली आहे. या इमारतीच्या पथकांच्या माध्यमातून पुुन्हा तपासणी केली जाणार आहे. आठ दिवसात तपासणी आहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने या इमारती बेकायदा असल्याचे जाहीर करून देखिल आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित इमारती बेकायदा असल्याचे जाहीर करून देखिल तीन जणांनी फ्लॅट खरेदी केली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महापालिकेतील बांधकाम विभागात बेकायदा समांतर यंत्रणा राबवून बनावट बांधकाम परवाने देऊन 96 इमारती उभारल्याचे प्रकरण गाजत आहे. या इमारतीवर कारवाईचा बडगा उगराला जाणार आहे. या प्रकरणातील संबंधित जागा मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 96 पैकी एकूण 27 जणांचे सुनावणी पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड