लिपिक-टंकलेखक भरती परीक्षा २३ मार्चला
पोलीस भरतीमुळे वेळापत्रकात बदल; ऑनलाईन परीक्षा दुपारी १ ते ३ लातूर, 17 मार्च (हिं.स.)।सैनिक कल्याण विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) या एकूण ७२ पदांसाठी टीसीएस-आयओएनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्
परीक्षा


पोलीस भरतीमुळे वेळापत्रकात बदल; ऑनलाईन परीक्षा दुपारी १ ते ३

लातूर, 17 मार्च (हिं.स.)।सैनिक कल्याण विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) या एकूण ७२ पदांसाठी टीसीएस-आयओएनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

सदर परीक्षा आता २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

उमेदवारांसाठी सूचना :परीक्षेच्या वेळेत व केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे तसेच ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व तयारी पूर्ण ठेवावी.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande