सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
न्युरो फिजिशिअन (कै.) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आठ दिवस होत आहेत. मात्र, पोलसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे-मानेच्या भावेतीच फिरत आहेत. या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी ‘मास्टर माईंड’ आहे काय, याचा तपास सुरू आहे. यासाठीच मनीषाला पुन्हा पोलीस कस्टडीत घेण्यात आले. मात्र, घटनेला सात दिवस उलटले तरी डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येमागील ‘मास्टर माईंड’ कोण याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. यामुळे पोलीस कुणाला वाचविण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जातोय.
(कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर दुसर्याच दिवशी मनिषाला अटक केली. मनीषाने केलेल्या धमकीच्या मेल मुळेच डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद डॉ. आश्विन वळसंगकर यांनी दिली होती. डॉ. शिरीष यांनी लिहलेली चिठ्ठीही सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी यामध्ये सामील आहे का याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयास सांगत मनीषाला दोनदा पोलीस कस्टडीत घेतले. मात्र, (कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येस आता सात दिवस उलटले तरी केवळ आणि केवळ मनीषाच्या भावेतीच तपासाची चक्रे फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड