परभणीत 42 किलो गांजा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा
परभणी, 18 मार्च (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील नरळद शिवारात नांदेड येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 9 लाख 26 हजार 300 रुपये किंमतीचा 42 किलो 130 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दा
परभणीत 42 किलो गांजा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा


परभणी, 18 मार्च (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील नरळद शिवारात नांदेड येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 9 लाख 26 हजार 300 रुपये किंमतीचा 42 किलो 130 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरळद शिवारातील चंदाबाई यादव काळे यांच्या ज्वारीच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड व साठा असल्याची गोपनीय माहिती नांदेड येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णहरी सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. या कारवाईवेळी सरकारी पंच म्हणून रावसाहेब जाधव, अमृत अवचार तसेच तलाठी सोनाली चौधरी उपस्थित होते. पथकाने शेताची तपासणी केली असता सुमारे 42 किलो 130 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत मानेजी जक्केवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदाबाई यादवराव काळे यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande