दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस; १० दुचाकी जप्त
जळगाव , 18 मार्च (हिं.स.)शहरात एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत चोरट्याला अटक करत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या असून, या
दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस; १० दुचाकी जप्त


जळगाव , 18 मार्च (हिं.स.)शहरात एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत चोरट्याला अटक करत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या असून, या कारवाईत आंतरराज्य स्तरावरचे चोरीचे जाळे उघडकीस आले आहे.नशिराबाद येथील २० वर्षीय समीर शेख याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत अखेर गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने जळगाव शहरासह एमआयडीसी, जिल्हापेठ आणि मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथूनही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले.

या कारवाईत ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या १० मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणामुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेल्या चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, आरोपीला पुढील चौकशीसाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande