नवी दिल्ली , 3 एप्रिल (हिं.स.)।भारत अंतराळ जगात आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे.भारतीय अंतराळवी रग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनणार आहेत.शुभांशू मे २०२५ मध्ये फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून अॅक्सिओम मिशन ४ (अॅक्स-४) अंतर्गत प्रक्षेपण करणार आहे.
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे (IAF) एक अनुभवी पायलट आहेत आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी नामांकित अंतराळवीरांपैकी एक आहेत.अॅक्स-४ मोहिमेत, शुभांशू स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानावर मिशन पायलटची भूमिका बजावणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. या मोहिमेत पोलंडचे स्झोझ उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन तज्ञ म्हणून सहभागी असतील. हे १४ दिवसांचे अभियान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक पोहोच आणि व्यावसायिक उपक्रम राबवेल. शुभांशू शुक्ला अंतराळात योगासन करून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करतील.
शुभांशू शुक्लाच्या या ऐतिहासिक सहभागामुळे, भारत अवकाश संशोधनाच्या जागतिक व्यासपीठावर आपले स्थान आणखी मजबूत करेल. १९८४ मध्ये राकेश शर्मा अंतराळात गेल्यानंतर हे अभियान भारताच्या अंतराळ प्रवासात एक नवीन मैलाचा दगड ठरेल. शुक्ला यांनी त्यांच्या भेटीचे वर्णन १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व असे केले. लाँचिंगची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे भारतीयांमध्ये या ऐतिहासिक क्षणाबद्दल उत्साह वाढत आहे. या मोहिमेमुळे, भारत अंतराळ संशोधन आणि खाजगी अंतराळवीरांची वाढती भूमिका आणखी मजबूत करेल, जी येणाऱ्या पिढ्यांना देखील प्रेरणा देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode