भारताचे पीओईएम-4 पृथ्वीच्या वातावरणात परतले
नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.) : भारताचे पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-4 (पीओईएम-4) पृथ्वीच्या वातावरणात परतले आहे. ज्यामुळे त्याने आणखी एक यश मिळवले आहे. पीओईएम-4चा सुरक्षित पुनर्प्रवेश हा अवकाशातील वाढत्या कचऱ्याला रोखण्यासाठी आणखी एक म
भारताचे पीओईएम-4 पृथ्वीच्या वातावरणात परतले


नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.) : भारताचे पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-4 (पीओईएम-4) पृथ्वीच्या वातावरणात परतले आहे. ज्यामुळे त्याने आणखी एक यश मिळवले आहे. पीओईएम-4चा सुरक्षित पुनर्प्रवेश हा अवकाशातील वाढत्या कचऱ्याला रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे अवकाश पर्यावरण आणि कचरामुक्त अंतराळ मोहिमांमध्ये भारतीय अंतराळ संस्थेच्या प्रमुख भूमिकेला पुन्हा पुष्टी देते.याबाबत इस्रोने म्हटले आहे की, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वरचा टप्पा पीओईएम-4 पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला आहे. इस्रोने ट्विटरवर (एक्स) पोस्ट केले की, पीओईएम-4 मॉड्यूल वातावरणात पुन्हा प्रवेश केला. ते भारतीय वेळेनुसार 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजून 3 मिनीटांनी हिंद महासागर क्षेत्रात पोहोचले. इस्रोच्या पीएसएलव्ही-सी60 रॉकेटने 30 डिसेंबर 2024 रोजी 'स्पॅडेक्स' मोहीम सुरू केली. 'स्पॅडेक्स' उपग्रहांना 475 किमी उंचीवर ठेवल्यानंतर पीएसएलव्ही-सी60 चा पीएस-4 टप्पा देखील जवळजवळ त्याच कक्षेत होता. हे अद्वितीय आणि कमी किमतीचे स्पेस प्लॅटफॉर्म पीएसएलव्ही-सी60 च्या पीएस-4 स्टेजचा वापर करून विकसित करण्यात आले आहे.

मोहिमेदरम्यान, पीओईएम-4 ने एकूण 24 पेलोड वैज्ञानिक प्रयोग केले.यापैकी 14 विविध इस्रोचे आणि 10 खाजगी विद्यापीठे आणि स्टार्ट-अप्सचे होते.या काळात, भारताने 'स्पॅडेक्स' मोहिमेसह पाठवलेल्या चवळीच्या बियांचे अंतराळात प्रथमच अंकुरीकरण करण्यात यश मिळवले.पीओईएम-4 कक्षेत असताना, इस्त्रोच्या रडार स्टेशन आणि युनायटेड स्टेट्स स्पेस कमांड केंद्रांद्वारे त्याचे सतत निरीक्षण केले जात होते.

इस्रोने सांगितले की ट्रॅकिंग डेटाचा वापर री-एंट्री प्रेडिक्शन प्रक्रियेत करण्यात आला. असे आढळून आले की, पीओईएम-4ची कक्षा 174 किमी/3165 किमी पर्यंत कमी झाली आहे आणि 4 एप्रिल रोजी प्लॅटफॉर्म पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल असा अंदाज होता. त्यानंतर, पीओईएम-4 री-एंट्री घटनेचे इस्त्रोच्या सिस्टम फॉर सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्स मॅनेजमेंट (आयएस4ओएम) द्वारे बारकाईने निरीक्षण केले गेले आणि अंदाज नियमितपणे अपडेट केले जात होते. पीओईएम हे इस्त्रोचे एक प्रायोगिक अभियान आहे. याअंतर्गत, पीएस-4 स्टेजचा ऑर्बिटल प्लॅटफॉर्म म्हणून वापर करून कक्षेत वैज्ञानिक प्रयोग केले जातात. पीएसएलव्ही हे चार टप्प्यांचे रॉकेट आहे. त्याचे पहिले तीन टप्पे वापरल्यानंतर समुद्रात पडतात आणि शेवटचा टप्पा उपग्रह कक्षेत सोडल्यानंतर अवकाशातील कचरा बनतो. इस्रोचे पीओईएम मिशन अवकाशातील कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास देखील मदत करेल.----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande