चंद्रपूर, 10 मे (हिं.स.)।सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत मेंढामाल येथील महिला तेंदुपत्ता संकलन करत असतांना वाघाने हल्ला केल्याने तीन महिला ठार,तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मेंढामाल येथील महिला तेंदुपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने अचानक हल्ला चढवला. त्यावेळी एका पाठोपाठ एक अशा सासू कांताबाई चौधरी (५५), सून शुभांगी चौधरी (३०) व सारिका शेंडे (५०) या तिघांवर हल्ला करून वाघाने त्यांना जागीच ठार केले, तर यात एक महिला जखमी झाली.एकाच कुटूंबातील सासू- सून यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला आहे.परिसरात गस्त वाढविण्यात आली असून जंगलात न जाण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव