चंद्रपूर, 10 मे (हिं.स.)। चंद्रपूर- गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीच्या पात्रात गेलेल्या गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस चे ३ विद्यार्थी बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी समोर आली.
गडचिरोली येथे एमबीबीएस चे प्रथम वर्षाचे सत्रात आठ विद्यार्थी सुट्टी असल्याने नदीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यातील बुलढाणा येथील गोपाळ गणेश साखरे, शिर्डी येथील पार्थ बाळासाहेब जाधव, तर छत्रपती संभाजीनगर स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे तीन बुडाले. या युवकांना काढण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. यावेळी सावली पोलिसांनी उशीर झाल्याने मोहीम थांबवली. सदर मोहीम रविवारी पुन्हा राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव