'मंगलाष्टका रिटर्न्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मुंबई, 10 मे (हिं.स.)।आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात पाहायला मिळणार अस
मंगलाष्टका रिटर्न्स


मुंबई, 10 मे (हिं.स.)।आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात पाहायला मिळणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेल्या 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. वीरकुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत.

नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष अनेक चित्रपटांतून पाहायला मिळाला असला, तरी सेलिब्रेशन करून घटस्फोट घेण्याची वेगळीच कल्पना मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात आहे. म्हणूनच सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही टॅगलाइन या चित्रपटाला नेमकी लागू पडते. घटस्फोट घेण्यापर्यंतच्या या गोष्टीत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, त्याला गाणी, विनोदाची फोडणीही देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणार हे ट्रेलरमधूनच दिसून येत आहे. त्याशिवाय उत्तम अभिनेत्यांची फौजच या चित्रपटात आहे. त्यामुळेच एक अनोखी, उलट गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठी केवळ २३ मे पर्यंतच वाट पहावी लागणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande