चालत्या दुचाकीवरती झाड कोसळून दोन युवकांचा मृत्यू
नाशिक, 12 मे (हिं.स.) - येथील देवळाली गाव, राजवाडा परिसरातून सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोघे युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे युवक कुटुंबात एकुलतेएक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. द
चालत्या दुचाकीवरती झाड कोसळून दोन युवकांचा मृत्यू


नाशिक, 12 मे (हिं.स.)

- येथील देवळाली गाव, राजवाडा परिसरातून सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोघे युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे युवक कुटुंबात एकुलतेएक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाब वाडी येथील गौरव भास्कर रिपोर्ट व सम्यक भोसले हे वीस वर्ष युवक सातपूर परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या गेट समोरून कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते.

त्याच वेळेस अचानक या ठिकाणी असलेले जुनाट व वाळलेले मोठे झाड अचानक मुळासकट उखडून यांच्या एक्टिवा Mh 15 HW 0565 या दूचाकी वर पडले, त्यात एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की झाड पडल्यानंतर या युवकांना वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, काहींनी १०८अॅम्बुलन्सला फोन केला, मात्र त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना कामगारांनी खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. ही घटना आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. दोघे तरुण मित्र होते व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते सोबतच कंपनीत रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत होते.

घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृत युवकांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित डोळे पाणावले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मनपाने वेळीच जुनाट व धोकेदायक वृक्ष काढून टाकले असते तर या युवकांचा प्राण वाचलं असतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande