मनमाड, 12 मे (हिं.स.) :गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असुन मनमाडला देखील पावसाची रोज हजेरी आहे आजदेखील वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली वादळामुळे इंदूर पुणे महामार्गावर बस स्थानकासमोर झाड कोसळले यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मात्र इंदूर पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली पावसामुळे महावितरणची मुख्य वायर तुटून पडली व विजेचा खांबही कोसळला सुदैवाने याचा देखील कोणाला त्रास झाला नाही स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगून तात्काळ महावितरण कार्यलयात फोन केला यामुळे त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी या भागातील विद्युत पुरवठा मात्र बंद झाला.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला असुन मनमाड शहर व नांदगाव तालुक्यात देखील मोठया प्रमाणात पावसाने नुकसान झाले आहे आज सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आज सकाळ पासुन उष्णतेचा पारा वाढला होता दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली या पावसाने मनमाड बसस्थानकासमोर असलेले झाड उन्मळून पडले तर विजेचा खांब देखील कोसळला यात विद्युत पुरवठा करणारी तार खाली कोसळली सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र यानंतर विद्युत पुरवठा मात्र खंडीत झाला सायंकाळी उशिरा पर्यंत महावितरण कर्मचारी याठिकाणी काम करत होते आज आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले साठवून ठेवलेला कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधीच अडचणीत असलेला बळीराजा आता पुन्हा संकटात सापडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI