जळगाव, 20 मे, (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात शहरातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघातातील मृतांची नावे असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (क्र MH 40, N9828) या बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. तर या अपघातात अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर