अकरावीच्या प्रवेशासाठी १० हजारांची लाच; दोन शिक्षक रंगेहात पकडले
जळगाव, 31 मे, (हिं.स.) - जिल्ह्यात रोजच लाचखोरीच्या घटना उघड होत आहेत. त्यातच शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांना अकरावी प्रवेशासाठी २० हजार रूपये लागतील, असे सांगत
अकरावीच्या प्रवेशासाठी १० हजारांची लाच; दोन शिक्षक रंगेहात पकडले


जळगाव, 31 मे, (हिं.स.) - जिल्ह्यात रोजच लाचखोरीच्या घटना उघड होत आहेत. त्यातच शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांना अकरावी प्रवेशासाठी २० हजार रूपये लागतील, असे सांगत १० हजारांची रक्कम स्वीकारतांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

गुलाब विरभान साळुंखे व उल्हास भास्करराव बागूल अशी लाचखोर शिक्षकांची नावे आहेत. तक्रारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता. याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मुलाने २७ मे रोजी या शाळेत जावून तेथे उपशिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशा करीता २० हजार रुपये द्यावे लागतील. त्यातील १० हजार रुपये ऑनलाईल अर्ज केल्यावर व उर्वरित १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेतांना द्यावे लागतील. त्याशिवाय शाळेत प्रवेश होणार नाही, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande