रत्नागिरी : नाचणे भाजपा मार्फत रविवारी आरोग्य शिबिर
रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : नाचणे (ता. रत्नागिरी) भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने येत्या रविवारी, दि. ११ मे २०२५ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नाचणे ग्रामपंचायतीच्या सदस्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सौ. दीप्ती ओंकार फडके यांच्या व
नाचणे येथे आरोग्य शिबिर


रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : नाचणे (ता. रत्नागिरी) भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने येत्या रविवारी, दि. ११ मे २०२५ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

नाचणे ग्रामपंचायतीच्या सदस्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सौ. दीप्ती ओंकार फडके यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर होणार आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत गोडाऊन स्टॉपवरील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये हे शिबिर होईल.

या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्डाविषयी माहिती, रक्तशर्करा, हाडातील कॅल्शियम, ताकतीची घनता, रक्तदाब या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी नाचणे पंचायत समिती गणातील भाजपा कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

शिबिरासाठी आमदार रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मध्य मंडलाध्यक्ष प्रतीक देसाई, शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. रत्नागिरीमधील अनेक नामवंत डॉक्टरांच्या सहकार्यातून हे शिबिर होणार आहे. नाचणे ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. दीप्ती ओंकार फडके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande