अमरावती जिल्ह्यात शनिवारपासून महाराजस्व समाधान शिबीर
अमरावती, 04 मार्च (हिं.स.) महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ जिल्ह्यातील ९५ महसुली मंडळात राबविण्यात येणार आह
महाराजस्व समाधान शिबीर जिल्ह्यात शनिवारपासून एकाच छताखाली मिळणार १५ विभागांच्या सेवा,


अमरावती, 04 मार्च (हिं.स.)

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ जिल्ह्यातील ९५ महसुली मंडळात राबविण्यात येणार आहे. सात मार्च रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वलगाव येथे शिबिराचे उद्घाटन होणारअसल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.या विशेष शिबिरात महसूल विभागासह महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सहकार विभाग, निवडणूक विभाग, नगर पालिका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग, पंचायत समिती, अन्न व नागरी पुरवठा, संजय गांधी योजना विभाग व मनरेगा आदी एकूण १५ विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये जिवंत ७/१२ मोहिम अंतर्गत वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, अपाक नोंदी, एकत्र नोंदी आदी प्रकरणे निकाली काढून ७/१२ व ८-अ वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज स्वीकृती व मंजुरी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, अधिवास, जातीचे व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे वितरण मंडळ स्तरावर फेरफार अदालतीद्वारे प्रलंबित फेरफार मंजुरी, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांची नोंद अद्ययावत करणे, शाळांमध्ये दाखला शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना दाखले वितरण, नविन अकृषक तरतुदी संदर्भात मार्गदर्शन, भोगवटादार वर्ग २ संदर्भातील अर्ज स्वीकृती व तपासणी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे, अतिक्रमित शेतरस्ते, शिवार रस्ते व पानंद रस्ते खुले करणे, ई-हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज स्वीकृती, आरोग्यविषयक सेवा (आभा कार्ड), लाडकी बहिण योजना ई-केवायसी, ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, वारस नोंदी, नकाशे वाटप, अँग्रीस्टॉक (फार्मर आयडी), पीएम किसान अंतर्गत लँड सिडिंग, आधार सिडिंग, ई-केवायसी कामकाज होणार असल्याचे जिल्हाधिकारी येरेकर यांनी सांगितले. या शिबिरामध्ये सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी थेट शिबिरात मांडून तत्काळ निवारण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. सर्व लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, तरुण मंडळे, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी येरेकर यांनी केले आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande