
अमरावती, 04 मार्च (हिं.स.)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डा कडून फेब्रुवारी-मार्च महीण्यात दरवर्षी १२वी व १०वी वर्गाची बोर्डाची परीक्षा घेतली जाते.या परीक्षा करीता पेपर ठेवण्या करीता प्रत्येक तालुकास्तरावर सुरक्षिता म्हणुन आणि परीक्षा केंद्राला पेपरचे वाटप करण्या करीता कस्टडी रुम दिली जाते.या कस्टडीचा प्रमुख त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी असतो.आणि त्यांना सहकारी म्हणुन हे अधिकारी केंद्रप्रमुख कींवा प्राथमिक शिक्षकांना घेतात.ही परीक्षा जवळपास एक महीना चालते या शिक्षकांच्या नेमणुकी मुळे त्यांच्या वर्गाचे शैक्षणिक नुकसान होते.त्यामुळे या परीक्षे करीता प्राथमिक शिक्षकांना घेऊ नये अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. १०वी व १२वी वर्गाची परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाव्दारे घेण्यात येते.परीक्षा केंद्राला पेपर पुरविण्याकरीता एका ठीकाणी सुरक्षित कस्टडी रुम तयार करण्यात येते येथे शिक्षण विभागातील अधिकारी व सहाय्यक यांची नेमणूक असते.नियमानुसार या कस्टडीत सहाय्यक म्हणुन एका लिपिकाची व शिपाई यांची नेमणूक करावी लागते पण शिक्षण विभागातील अधिकारी या कस्टडीत प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करतात.आणि घडणार्या प्रकाराला बळी पडतात असे प्रकार घडू नये आणि प्राथमिक शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणुन परीक्षा बोर्डाने अश्या कस्टडीत प्राथमिक शिक्षकांना नेमणूका देऊ नये आणि अश्या नेमणूका शिक्षकांनी नाकाराव्यात अश्या असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे. नुकताच अमरावती जिल्हात घडलेला पेपर फुटिचा प्रकार आणि या प्रकरणात ठरवलेले प्राथमिक शिक्षकांना दोषी हे प्रशासनाचे बळी आहे.या प्रकरणात प्रभारी गटशिक्षणाधिकारी,प्रभारी प्राथमिक शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होण्यापूर्वी या बाबतची सत्यता पडतारणे आवश्यक आहे.प्राथमिक विभागाचे कार्य सोडून माध्यमिक विभागाची कामे प्राथमिक शिक्षकांना का दिली जातात या बाबत चौकशी व्हावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी