सर्वसामान्य कार्यकर्ता ते शहराध्यक्ष असा प्रवास अखेर भाजपने सुनील केदारांना दिला न्याय
नाशिक, 1 जून (हिं.स.)। गेले ३५ वर्षापासून भारतीय जनता पक्षात एक साधा कार्यकर्ता ते पक्षाचे शहर सरचिटणीस असलेले सुनील रघुनाथ केदार यांची पक्षाने दखल घेतली असून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदी निवड केल्याने खरोखर केदार यांना पक्षाने न्या
सर्वसामान्य कार्यकर्ता ते शहराध्यक्ष असा प्रवास  अखेर भारतीय जनता पक्षाने सुनील केदार दिला न्याय


नाशिक, 1 जून (हिं.स.)।

गेले ३५ वर्षापासून भारतीय जनता पक्षात एक साधा कार्यकर्ता ते पक्षाचे शहर सरचिटणीस असलेले सुनील रघुनाथ केदार यांची पक्षाने दखल घेतली असून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदी निवड केल्याने खरोखर केदार यांना पक्षाने न्याय दिला असून त्यांच्या निवडीचे शहर तसेच जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे.

सुनील केदार यांचे शिक्षण बी कॉम झाले असून त्यांनी

त्यांनी भारतीय जनता पक्षात सन १९९० ते १९९९ सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर १९९९ ते २००९ नाशिक भाजप व भाजयुमो प्रसिद्धी प्रमुख , २००९ ते २०१३ भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष २०१३ ते २०१६ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस २०१७ ते २०१९ भाजप नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष २०१९ ते २०२५ भाजप नाशिक महानगर सरचिटणीस या पदावर कार्य केले आहे. ते चेअरमन - जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे चेअरमन असून कादवा सहकारी साखर कारखाना नाशिक,दिंडोरी चे संचालक आहेत.त्याचप्रमाणे

नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक ऊमराळे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आहेत . त्यांनी सलग ५ विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात प्रवासी कार्यकर्ता प्रचारक म्हणून देखील काम केले आहे. तसेच एक वेळा राजस्थान कोटा येथे विधानसभा निवडणुकीत प्रवासी कार्यकर्ता प्रचारक देखील काम केले. त्यांचा लोकसभा, विधासभा, स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक महानगर पालिका या प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग राहिला आहे. ते पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था, पंचवटीचे संस्थापक देखील आहे. पक्षाचे पंचवटी मंडल अध्यक्ष असताना वेळवेळी त्यांनी विविध आंदोलन केले आहेत.त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने सर्वसामान्य उत्साह संचारला असून शहर तसेच जिल्हाभरातून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande